चिंताजनक! भारतीय जवान कोरोनाच्या विळख्यात

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. परंतु आता नागरिकांना वाचवणार्या पोलीस तसेच जिवांना कोरोनाने ग्रस्त केले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

मागील 15 दिवसात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपट्टीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सीएपीएफमध्ये कोरोनाबाधितांची संख्या १ हजार 180 पर्यंत पोहोचली आहे.

बीएसएफमध्येही आतापर्यंत 400 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 286 जवान झाले कोरोनामुक्त झाले आहेत. हा आकडा संक्रमित झालेल्यांच्या दुप्पट आहे.

यामध्ये सीआरपीएफचे मुख्य चिकित्स अधिकारी आणि जवान यांना संसर्ग झाल्यानंतर सीआरपीएफचे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

सीआरपीएफमध्ये संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये 359 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामध्ये 220 कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील सर्व एअरपोर्टवर तैनात सीआयएसएफमध्येही 184 जवानांना लागण झाली असून यातील 116 जणं बरे झाले आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe