Grah Gochar : एप्रिल महिना सुरू होणार आहे. या काळात अनेक ग्रह आपल्या चाली बदलतील. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. अशातच 13 एप्रिल रोजी ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे, तर 23 एप्रिल रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. ग्रहांचा राजकुमार बुध एप्रिल महिन्यात तीनदा आपला मार्ग बदलेल, 9 एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करेल. 24 एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करेल.
तर पुढील महिन्यात, चंद्र 13 वेळा आपली राशी बदलेल. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव दिसून येईल. ग्रहांच्या या राशी परिवर्तनाचा चार राशींवर सर्वाधिक परिणाम दिसून येणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा महिना खूप उत्तम असेल. करिअर आणि बिझनेसमध्ये भरपूर फायदा होईल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. सुखद प्रवासाची संधी मिळेल. आरोग्याचाही फायदा होईल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी पुढील महिना खूप शुभ राहील. मुलांकडून आनंद मिळू शकेल. लग्नाची शक्यता आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. पदोन्नतीची शक्यता आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना शुभ राहणार आहे. प्रगतीची शक्यता आहे. लव्ह लाईफ आणि पर्सनल लाईफ दोन्ही चांगले राहतील. करिअरमध्ये फायदे होतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना पुढील महिन्यात लाभ होईल. पगार वाढेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. पदोन्नतीचा लाभ मिळेल. एप्रिल महिना आरोग्यासाठीही उत्तम राहील.