आ. राम शिंदे खा. विखेंची माफी कबूल करणार की आणखी वेगळेच डावपेच टाकणार? त्यांच्या सूचक इशाऱ्यानंतर विखेंची धाकधूक पुन्हा वाढली

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभेच्या अनुशंघाने विविध सुरु असणारे राजकीय डावपेच, राजकीय वादळ अद्यापही कमी होण्याची नाव घेईना. अगदी उमेदवारी मिळवण्यापासून सुरु असणारी विखे यांची धडपड अद्यापही संपण्याचे नाव घेईना.

अद्याप विरोधक फिक्स नसला तरी भाजपांतर्गत असणारी नाराजी हि काही मिटता मिटेना. यातील आघाडीचे नाव म्हणजे आ. राम शिंदे. ते अद्यापही विखे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या बैठकीत विखे यांनी माफी मागितली असली, किंवा आ. शिंदे यांनी जरी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले असले तरी अद्याप त्यांच्या सर्व काही आलबेल आहे असे दिसत नाही.

त्यात नुकतेच नगर शहरात आ. शिंदे यांनी केलेले वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. नगरच्या वाडिया पार्कमध्ये राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी सामने पाहायला आलेल्या आ. प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या नाराजगीवर पुन्हा फुंकर मारली.

काय म्हणाले आ. शिंदे ?

अहमदनगर लोकसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर गेल्या पाच वर्षांत मी कोणत्या मुद्द्यांवर नाराज होतो,

हे स्पष्ट करेल, असे आ. राम शिंदे यांनी सांगितले. तसेच तिकीट जाहीर झाल्यानंतर पाचव्यांदा माफी मागण्याची वेळ आली तसे व्हायला नको होते अशी सूचक टिप्पणीही प्रा. शिंदे यांनी विखे यांचे नाव न घेता केली.

पुन्हा लोकसभेविषयी इच्छा

यावेळी बोलताना लोकसभेविषयी असणारी त्यांची इच्छा त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. ते म्हणाले, अहमदनगर लोकसभेसाठी मीही इच्छुक होतो परंतु सध्या खा. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नसले तरी मी प्रत्यक्षात डॉक्टर विखेंना उमेदवारी मिळाल्यानंतर शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीही जाहीरपणे दिलेली असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी झालेल्या चर्चांचेही स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले असून त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती मला समजली आहे.

परंतु त्यानंतर मला अद्याप फडणवीस यांच्याकडून काहीही निरोप नसून नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe