खा. सुजय विखेंना निलेश लंकेचं निकराची लढत का देऊ शकतात ? ही पाच कारणे समोर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपने खा. सुजय विखे यांना उमेदवारी दिली असली तरी अजून त्यांच्या विरोधात कोण असेल याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. असे असले तरी आ. निलेश लंके यांचे नाव चर्चेत असल्याने ही लढत अत्यंत निकराची असणार अशीच चर्चा सध्या सर्वत्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य यादी सध्या समोर आली आहे. त्यात अहमदनगर लोकसभा मध्ये उमेदवार हे निलेश लंके असतील असे दिसत आहे.

अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे हे उमेदवार असल्याने शरद पवार गटाकडून तगडा नेता शोधण्याचे आव्हान होते व एकंदरीतच निलेश लंके यांच्या रूपाने हे आवाहन ते पेलतील असे चित्र सध्या दिसत आहे.

पण हीच लढत अर्थात सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके ही लढत निकराची होईल असे का म्हटले जात आहे? चला त्यामागची करणे जाणून घेऊयात –

अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलांच्या पक्षांतर्गत वैरी वाढत असल्याचे चित्र असून यात आ. राम शिंदे यांची नाराजगी प्रामुख्याने मानली जाते. व त्यात आ. शिंदे व आ. लंके यांची मैत्री सध्या सर्वश्रुत आहे.

कर्जत जामखेडमधून रोहित पवार तर राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे लंके यांना अधिक मते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील असे म्हटले जात आहे.

आता इतर मतदार संघ पाहिले तर उदा. श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट देखील प्रचंड सक्रिय तेथे असल्याने येथील लीड ते कव्हर करू शकतात.

यातच खा. सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी दिली असली तरी भाजपचे आमदार राम शिंदे, युवा नेते विवेक कोल्हे उघडउघड लंके यांना मदत करत असल्याचे व विखे यांना जाहीर कार्यक्रमात विरोधकरत असल्याचे चित्र मागील दिवसांपासून आहे

आणखी एक महत्वाची ताकद म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील लंकेंना विजयी करण्यात मोठा हातभार लागू शकेल कारण त्यांची देखील एक मोठी व्होटबँक आहे.

या वरील पाच कारणांमुळे ही लढत अत्यंत निकराची होईल असे मानले जात आहे. आता आगामी काळात काय घडामोडी घडतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe