राहुरीचा येता आठवडे बाजार बुधवारी भरणार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचा गुरुवारी भरणारा आठवडे बाजार शिव जयंती व महावीर जयंती असल्याने बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असल्याने आणि याच दिवशी राहुरी शहरातील आठवडे बाजार भरत असल्याने, या कायदा व सुव्यवस्था अवाधित राखण्याच्या दृष्टीने बंद ठेवणेस अथवा आठवडे बाजार तत्पूर्वी बुधवार दिनांक २७ मार्च २०२४ रोजी भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिनांक २८ मार्च २०२४ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती व मिरवणुकीचा कार्यक्रम होणार असल्याने, राहुरी शहरात भरत असलेल्या आठवडे बाजारात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या दृष्टीने राहुरी शहरातील गुरुवारी भरत असलेला आठवडे बाजार बंद ठेवणे आवश्यक आहे.

त्यामुळे गुरुवारी भरणारा आठवडे बाजार बुधवारी भरवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी ठोंबरे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe