दुचाकी चोरीतील आरोपीस अटक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : दुचाकी चोरीतील आरोपीस तात्काळ अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. येथील श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने नुकतीच ही कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रामभरत शामबिहारी यादव यांची लाल रंगाची यूनिकॉर्न दुचाकी राहत्या घरुन चोरी केली.

याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

सदरचा गुन्हा शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख यांने केल्याचे निष्पण झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला. तेव्हा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सदरचा आरोपी चोरी केलेल्या मोटारसायकलवर बसून हुसेननगर वार्ड नंबर १कडे जात असल्याची

गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस तपास पथकाने तात्काळ मदर टेरेसा चौकात सापळा लावला. सदरचा आरोपी हा रेल्वे पटरीकडुन हुसेननगरकडे येताना दिसला. तेव्हा तपास पथकाने त्यास ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe