धक्कादायक! पबजीसाठी आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

आईने पबजीसाठी इंटरनेट रिजार्ज केला नाही म्हणून आयटीआयच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भोपाळमध्ये राहणाऱ्या नीरज कुशवाह या विद्यार्थ्याला पबजी खेळण्याची सवय होती. नीरजने आपल्या आईकडे पबजी खेळण्यासाठी तीन महिन्याचा रिचार्ज करण्यास सांगितले.

पण आईने फक्त एक महिन्याच रिचार्ज करेन असे सांगितले. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. नीरजने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले.

खूप वेळ बोलवून जेव्हा तो आला नाही तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. नीरजने गळफास घेतल्याचे समोर आले. तातडीने त्याला जवळच्या इस्पितळात हलवण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment