ST Smart Card Yojana : तुम्हीही लाल परीने प्रवास करताना ? मग आजची बातमी तुमच्यासाठीच. खरे तर महाराष्ट्रात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लाईफ लाईन आहेत. प्रवासी या गाडीला प्रेमाने लाल परी म्हणतात. या बसेस सोबत प्रवाशांचे एक इमोशनल अटॅचमेंट आहे असेच म्हणावे लागेल.
दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी शासनाकडून काही योजना देखील राबवल्या जात आहे. यामध्ये महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिली जात आहे. एवढेच नाही तर सुपर सीनियर सिटीजन यांना तिकीट दरात शंभर टक्के सवलत दिली जात आहे.
सुपर सीनियर सिटीजन म्हणजेच ज्यांचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जात आहे. याशिवाय, सिनिअर सिटीजन यांना म्हणजे ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांना तिकीट दरात 50 टक्के एवढी सवलत दिली जात आहे.
पण सरकारच्या या सवलतीचा अनेकजण दुरुपयोग करत असल्याचे आढळून आले आहे. अपात्र लोक देखील सरकारच्या या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आल्याने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे.
काही प्रवाशी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीचा मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली आहे.
खरे तर मध्यंतरी ही सुविधा बंद झाली होती. आता मात्र ही योजना पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांना लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड काढण्याचे आव्हान केले जात आहे.
हे स्मार्ट कार्ड फक्त जेष्ठ नागरिकांनाच काढाता येणार आहे. हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत जर हे स्मार्ट कार्ड काढले नाही तर ओळखपत्र दाखवूनही मोफत प्रवास किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार नाही.
खरेतर सध्या स्थितीला ज्येष्ठ नागरिक कोणतेही ओळखपत्र दाखवून म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र इत्यादी दाखवून एसटीने मोफत प्रवास करू शकता किंवा अर्ध्या तिकिटात प्रवास करू शकतात. पण भविष्यात स्मार्ट कार्ड आवश्यक राहणार आहे. यामुळे हे कार्ड लवकरात लवकर काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.