Ahmednagar News : तुझे वाद झाले आहेत, मी विनाकारण कशाला वाद घालू, असे म्हणाल्याचा राग आल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुतिक किशोर डागवाले (रा. तनपूरेवाडी, राहुरी) हा तरुण त्याचे मित्र दत्ता गोलवड, सुभाष तोरणे तसेच आरोपी सागर बाबासाहेब साळुंके हे (दि.२२) रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यावर कॉलेज परिसरात असलेल्या हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेथे त्या सर्वानी जेवन केले. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉटेलच्या बाहेर आले.
त्यावेळी आरोपी सागर बाबासाहेब साळुंके हा रुतीक डागवाले यास म्हणाला कि, माझे व ऋषिकेष रामनाथ मापारी यांच्याशी वाद झालेले आहेत. तु पण त्याच्याशी वाद घाल. त्यावेळी रुतीक डागवाले त्यास म्हणाला कि, मी असे काही करणार नाही.
विनाकारण मी तुझ्यासाठी कशाला वाद घालु, तुमचे वाद तुम्हीच पाहुन घ्या, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी सागर साळुंके याने रुतीक डागवाले याला शिवीगाळ, दमदाटी केली. आणि एक बिअरची रिकामी काचेची बाटली रुतीक डागवाले याच्या डोक्यात फोडली.
त्यामुळे रुतीक डागवाले हा तरूण गंभीर जखमी झाला. घटनेनंतर रुतिक किशोर डागवाले याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून आरोपी सागर बाबासाहेब साळुंके (रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी) याच्यावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.