Ahilyanagar News : मार्केटयार्डमधील दुकानास भीषण आग, ५० फूट उंचीचे धुराचे लोट..लाखोंचे नुकसान

Published on -

Ahilyanagar News : श्रीगोंदा शहरातील मार्केटयार्ड मधील एका खताच्या दुकानाला आज सकाळी (२७ मार्च) आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की ५० ते ६० फूट उंचीचे धुराचे लोट दिसत होते.

अधिक माहिती अशी : श्रीगोंदा मार्केटमध्ये एक खताचे दुकान आहे. या ठिकाणी रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक, औषधांची विक्री केली जाते. बुधवारी सकाळी अचानक दुकानाला आग लागली. ही घटना मार्केटमधील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तसेच गौरी शुगर कारखान्याच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.

दरम्यान दोन्ही अग्निशामक विभागाचे बंब अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले. या बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या दुकानात ठेवलेले खते व बी बियाणे जळून खाक झाले असल्याने

त्यात लाखो रुपयांचे नुकसान असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. नागरिकांनी व अग्निशामक दलांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe