महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित ? उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा आठवली पहाटेची शपथविधी

Published on -

Maharashtra Loksabha News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांकडून आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. आज युबीटी शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यात 17 नावांचा समावेश होता. यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद-विवाद पाहायला मिळतं आहेत. काँग्रेसने चक्क उबाठा शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीवर आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसने सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर आपला दावा सांगितला आहे. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाने सांगलीतून तिकीट दिले आहे. तसेच पश्चिम मुंबई मधून अमोल कीर्तिकर यांना तिकीट देण्यात आले आहे.

परंतु काँग्रेसमधून सांगलीच्या जागेवर आमदार विश्वजीत कदम इच्छुक असून ते पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी गेले आहेत. इकडे पश्चिम मुंबईमधून संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये स्पष्टपणे मत-मतांतर असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीने देखील महाविकास आघाडीसोबत ब्रेकअप केला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये सार काही आलबेल नाहीये अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

अशातच मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडीमधून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा यावेळी केला आहे.

फडणवीस यांनी यावेळी असे म्हटले आहे की, ‘मविआमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत, अशी परिस्थिती पाहायला मिळतं आहे. यामुळे अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत.

तसेच वंचित आणि मविआत काय झालं ? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हणत यासंदर्भात मला काहीही बोलायचं नाही.’ फडणवीस यांनी जागा वाटपावरून महाविकास आघाडी मध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून खोचक टीका केली आहे.

पण, फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादी मोठी घडामोडी घडणार का, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोमणा लगावला आहे.

ते प्रसंगी बोलताना असे म्हटले की ‘असं आहे, सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे. आम्हाला याची सवय आहे. काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांना सुद्धा ही सवय करून घ्यावी लागेल. कारण ते असचं वागतात.’

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe