‘विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेचे हाल चालवलेत’

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आपण अडीच महिन्यांत एमआयडीसीकरिता मान्यता आणली. आता प्रलंबित तुकाईचारी प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. मात्र माझ्या विरोधकांनी कर्जत जामखेडच्या जनतेची राखरांगोळी चालवली असल्याचे सांगत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर चांगलीच सडकून टीका केली.

कर्जत तालुक्यातील कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे होणाऱ्या एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. यानंतर आज एमआयडीसीला मान्यता मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मिरजगाव येथील व्यापारी बांधव आणि ग्रामस्थांच्यावतीने आ.प्रा.राम शिंदे यांचे स्वागत करून लाडू वाटप करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकांच्या गाड्या चालवणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. तुमचा कार्यक्रम झाला ते बघा तिकडे. आता रोज पिक्चर चालू आहे. सोन्याच्या चमच्यावाल्याला जे जमले नाही ते करून दाखविले.

असून तालुक्यातील विहिरींची कोणी तपासणी लावली व कोणी बंद केल्या यांची लवकरच चौकशी लावणार आहे. कर्जत जामखेडच्या विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, बाजार समितीचे माजी संचालक संपत बावडकर, डॉ. रमेश झरकर, हरिदास केदारी, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे,

अशोक खेडकर, तालुका सरचिटणीस दत्ता मुळे, सरपंच नितीन खेतमाळस, माजी उपसभापती प्रशांत बुद्धीवंत, बाजार समितीचे संचालक लहू वतारे, भाजपा शहराध्यक्ष संदीप बुद्धीवंत, अमृत लिंगडे,

संजय तापकीर, मनोहर रासकर, मोहन खेडकर, तात्या खेडकर, मिनिनाथ शिंदे, संतोष कोरडे, अशोक शिंदे, कैलास बोराडे, सारंग घोडेस्वार, दादा बुद्धीवंत, भाऊसाहेब गावडे, पप्पू कोठारी, संजय शेलार, पंडा बोरुडे, विजय माने आदींसह परिसरातील ग्रामस्थ व्यापारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe