Gold Rate : सध्या संपूर्ण देशभर लग्नसराईचा हंगाम प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे पुढल्या महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण देखील येणार आहे. यानंतर अक्षयतृतीयाचा मोठा सण येणार आहे. अशा परिस्थितीत सध्या सराफा बाजारात मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे सराफा बाजारात भविष्यात आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सराफा बाजारात सुवर्ण खरीदेने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
याचा परिणाम म्हणून सुवर्णचे भाव कधी नव्हे ते विक्रमी भाव पातळीवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात सोने आणखी कडाडणार आहे. सोन्याची चमक नजीकच्या भविष्यात आणखी वाढणार आहे.
त्यामुळे सोने खरेदीची ही सर्वोत्कृष्ट वेळ असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमती लवकरच 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे आता आपण सोन्याच्या किमती कोणत्या महिन्यात विक्रमी भाव पातळीवर पोहोचतील याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी News 18 ला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 2024 मध्ये जगाची आर्थिक स्थिती, भू-राजकीय तणाव आणि सांस्कृतिक मागणीमुळे सोन्याच्या आणि इतर मौल्यवान दागिन्यांच्या किमतीत मोठी वाढ नमूद केली जाऊ शकते.
विशेष म्हणजे किमतीत वाढ होत असली तरीदेखील नजीकच्या भविष्यात सोन्याची मागणी वाढणार आहे. बाजारात सुधारणा झाली तर सोन्याची मागणी वाढेल आणि वर्षअखेरीस मोठी उसळी दिसू शकते.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 28 मार्चला 24 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 40 रुपये एवढी नमूद करण्यात आली. मात्र अक्षय तृतीया पर्यंत यामध्ये पाचशे रुपयांपर्यंतची घसरण होण्याची शक्यता आहे.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयाच्या कालावधीमध्ये सोने 68 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. अक्षय तृतीया 10 मे ला आहे. मात्र यानंतर सोने आणखी कडाडणार आहे. 29 ऑक्टोबरला धनतेरस आहे.
यावेळी सोन्याच्या किमती 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहोचतील अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे किरकोळ खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच रिझर्व बँकेने सोने खरेदीवर भर दिला आहे.