आताची सर्वात मोठी बातमी ! मनोज जरांगे पाटील ‘या’ लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

Published on -

Maharashtra Loksabha Election : भारतात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ज्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत, तसेच उमेदवारी मिळण्याची आशा आहे ते उमेदवार कामाला देखील लागले आहेत.

अशातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मराठा आंदोलनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतात अशी शक्यता आहे.

जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे असा प्रस्ताव जालनाच्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की, जालना येथे नुकतीच सकल मराठा समाजाची नुकतीच महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.

यात जालन्यातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला पाठिंबा द्यायचा.

चळवळीत काम करणाऱ्याला उमेदवारी द्यायची, नाहीतर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यासारखे वाद होतील, त्यामुळे जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठरावही मंजूर झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटले ?

जालना येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असा ठराव मंजूर झाला. दरम्यान, या प्रस्तावावर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे.

जरांगे पाटील यांनी यासंदर्भात बोलताना असे म्हटले आहे की, लोकसभेला उमेदवार द्यायचा का नाही किंवा स्वत:हून निवडणूक लढवायची का ? याचा उद्या गावागावातून अहवाल येईल, त्यानंतर मग पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करणार आहे.

यामुळे आता मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News