खात्यावर जमा झालेले एक लाख तेरा हजार केले परत

Published on -

Ahmednagar News : नजरचुकीने शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा झालेले व्यापाऱ्याचे १ लाख १३ हजाराची रक्कम शेतकऱ्याने परत केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील चांदा येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी अजित चंपालाल गुगळे यांना प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. अजित गुगळे यांचे चांदा- घोडेगाव रोड लगत भुसार मालाचे दुकान आहे.

भुसार मालाच्या खरेदीपोटी गुगळे यांच्याकडून नजर चुकीने मीराबाई संजय वाघ (महालक्ष्मी हिवरे) यांच्या खात्यावर एक लाख तेरा हजार रुपयाची रक्कम घोडेगाव येथील बडोदा बँकेच्या शाखेत जमा झाली. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला पाहिजे ते झालीच नाही.

ही बाब काही वेळाने गुगळे यांच्या लक्षात आली. त्यांनी वसंत भगत व सागर टेकाडे यांना ही माहिती दिली. त्यांनी गुगळे यांना धीर देत घोडेगावचे सचिन चोरडिया व वैभव चोरडिया यांच्या मदतीने नेमके कोणाच्या खात्यावर हे पैसे जमा झाले, हे बडोदा बँकेचे शाखा अधिकारी व शाखेतील अधिकारी यांच्या सहकार्याने शोधले.

पूर्वी गुगळे यांना भुसार माल दिला होता असे महालक्ष्मी हिवरे येथील प्रामाणिक शेतकरी संजय वाघ यांच्या पत्नीच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असल्याचे निष्पन्न झाले. गुगळे यांनी वाघ यांना संपर्क केला व खात्यात चुकून पैसे जमा झाल्याची माहिती दिली.

त्यावर वाघ यांनी कोणत्याही प्रकारचे विलंब न करता गुगळे यांना त्यांच्या खात्यावर हे पैसे परत केले. त्याबद्दल वाघ यांच्या इमानदारीचे संजय गुगळे, अजित गुगळे यांनी व तालुक्यातील व्यापारी बंधूंनी व ग्रामस्थांनी कौतुक केले. तसेच निरज मनोचा व किरण केदार यांनी या कामी सहकार्य केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!