दर्शनरांगेत महिलांच्या दागिन्यांची चोरी; एक लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपास

Published on -

Ahmednagar News : मढी येथील रांगेत दर्शन घेताना नगरच्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व छत्रपती संभाजीनगरच्या विष्णू येडुबा गजरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील तिन तोळ्याचे सोन्याची दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

मढी यात्रेत यावर्षी चोऱ्यांचे प्रमाण कमी राहिले असले तरी चोरट्यांनी हात चलाखी दाखविली आहे. नगरच्या नागापूर एमआयडीसीमधील शुभांगी दिपक झावरे यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला गेले आहे.

मढी येथे दर्शन घेताना ही घटना घडली. दुसरे भाविक विष्णु येडुबा गजरे (रा. सातारा परीसर, छत्रपती शंभाजीनगर) येथील आहेत. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी व दीड तोळ्याचे मीनि गंठण, असे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.

मढी यात्रेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांबबात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. एक लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद केली आहे. मढी यात्रेत यावर्षी चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, दोन घटना घडल्या आहेत.

मढी यात्रेसाठी आलेला एक भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे येथील हा इसम असल्याचे समजते. मात्र, त्याचे नातेवाईक येण्यास उशीर झाल्याने नेमके नाव समजू शकले नाही. मयताची ओळख पटली असून, नातेवाईक आल्यानंतर नाव समजेल, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe