Samsung Galaxy : सॅमसंग लवकरच भारतात आपला आगामी स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, कंपनीने हा फोन ब्राझीलमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स उपलब्ध असतील. कंपनीने भारतात लॉन्च होण्याची तारीख अद्याप जाहीर केली नसली तरी या फोनचे फीचर्स नक्कीच लीक झाले आहेत. Samsung Galaxy M55, Galaxy A55 ची सुधारित आवृत्ती असेल. चला तर मग जाणून घेऊया Samsung Galaxy M55 मध्ये कोणते खास फीचर्स असतील…
Samsung Galaxy M55 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमधील कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि हा फोन डॉल्बी साउंड देखील देईल. काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी या सॅमसंग फोनमध्ये फुल एचडी रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देईल, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.
याशिवाय Samsung Galaxy M55 च्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे असतील. तसेच, Samsung Galaxy M55 फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. याशिवाय, हा फोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह वेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. एवढेच नाही तर Samsung Galaxy M55 मध्ये 12 रॅम सह स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल. खरं तर, हा आतापर्यंतचा सर्वात पातळ Galaxy M-सिरीज फोन असणार आहे.
तर Samsung Galaxy M55 भारतात दोन रंग पर्यायांमध्ये लॉन्च केला जाईल, जर आपण Samsung Galaxy M55 फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी व्यतिरिक्त, 45W वायर्ड फास्ट चार्जिंग देखील मिळेल. हा फोन Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 1 Soc सह Adreno(TM) 644 GPU सह लॉन्च केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy M55 किंमत
Samsung Galaxy M55 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनचा 8GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंट 26,999 रुपयांना उपलब्ध होईल. तर त्याच्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत सुमारे 29,999 रुपये असेल. तसेच, त्याच्या टॉप वेरिएंट 12GB RAM 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 32,999 रुपये असेल.