IRCTC Tour Package:- भारतातील अनेक हौशी आणि उत्साही पर्यटक देशातील अनेक पर्यटन स्थळांना दरवर्षी भेट देतात व एवढेच नाही तर विदेशातील महत्त्वपूर्ण अशा पर्यटन स्थळनादेखील भेट देण्याचे प्रमाण भारतीयांमध्ये सर्वात जास्त आहे.
त्यातल्या त्यात उन्हाळ्यासारख्या उष्ण कालावधी मधून काहीशी सुटका मिळावी याकरिता देशातील अनेक हिल स्टेशन, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी पसंती दिली जाते व त्यासोबतच विदेशातील देखील बऱ्याच ठिकाणी पर्यटक जात असतात. विदेशातील पर्यटनाच्या बाबतीत पाहिले तर युरोप मधील विविध देशांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.

अगदी याच अनुषंगाने बघितले तर आयआरसीटीसीने यूरोप खंडातील विविध देशांमध्ये पर्यटनाची मजा घेता येईल या उद्देशाने एक मस्त आणि स्वस्तातले टूर पॅकेज सादर केलेले आहे. या टूर पॅकेजअंतर्गत तुम्ही जर्मनी, फ्रान्स सह स्वित्झर्लंडसह पाच देशांची सैर करू शकणार आहात. याच टूर पॅकेजची माहिती या लेखात घेऊ.
आयआरसीटीसीने आणले विशेष टूर पॅकेज
भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने एक उत्तम असे टूर पॅकेज आणले असून या अंतर्गत तुम्हाला जर्मनी तसेच स्वित्झर्लंड सह युरोपातील पाच देश फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजेची सुरुवात लखनऊ पासून होणार असून हे पॅकेज 13 दिवस आणि बारा रात्रीचे आहे.
या टूर पॅकेज अंतर्गत 29 मे 2024 पासून प्रवासाला सुरुवात होणार आहे व याकरिता आवश्यक बुकिंग देखील सुरू करण्यात आलेली आहे. या पॅकेजेच्या माध्यमातून तुम्हाला बेल्जियम, नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंडला भेट देण्याची उत्तम संधी चालून आलेली आहे. या अंतर्गत तुम्ही ज्युरिख स्वित्झर्लंड,
ब्रसेल्स( बेल्जियम ), फ्रॅंकफर्ट( जर्मनी), ॲमस्टरडॅम( नेदरलँड ) पॅरिस( फ्रान्स ) हे डेस्टिनेशन कव्हर करू शकणार आहेत. या टूरची डेट 29 मे 2024 असून तुम्ही या पॅकेजअंतर्गत फ्लाईटने प्रवास करणार आहात. या टूर पॅकेज अंतर्गत तुमच्यासाठी ब्रेकफास्ट तसेच लंच आणि डिनरची सोय देखील असणार आहे.
किती येईल खर्च?
साधारणपणे या टूर पॅकेजेचे जे काही दर आहेत ते प्रवासी जी काही आक्युपॅन्सी निवडेल त्यावर आधारित असतील. परंतु तरीदेखील या पॅकेजेची सुरुवात तीन लाख पाच हजार चारशे रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. या पॅकेज अंतर्गत जर तुम्ही एका व्यक्तीसाठी बुकिंग करत असाल तर तुम्हाला तीन लाख 67 हजार आठशे रुपये खर्च करावे लागू शकतात.
तसेच तुम्ही या अंतर्गत दोन लोकांकरिता बुकिंग करत असाल तर प्रति व्यक्ती तीन लाख सहा हजार शंभर रुपये, तीन व्यक्तींकरिता बुकिंग करताना प्रति व्यक्ती तीन लाख पाच हजार चारशे रुपये इतका खर्च करावा लागेल.
या टूर पॅकेजसाठी बुकिंग कशी कराल?
तुम्हाला देखील या पॅकेजेची बुकिंग करायचे असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन बुकिंग करू शकतात.