आनंदाचा शिधा योजनेला लोकसभेचे ग्रहण, आता ‘या’ तारखेनंतरच मिळणार 100 रुपयाचा शिधा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loksabha Election : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल खऱ्या अर्थाने वाजला आहे. लोकशाहीचा महाकुंभ आता सजला असून लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. लोकसभेसाठी जाहीर झालेले उमेदवार आता प्रचाराला देखील लागले आहेत.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मात्र मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. खरे तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्यांसाठी आनंदाचा शिधा ही योजना राबवली जात आहे.

या अंतर्गत सर्वसामान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबांना सणासुदीला शंभर रुपयात एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा संच दिला जातोय. गेल्या वर्षी गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता.

याशिवाय 22 जानेवारी 2024 ला श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य दिव्य राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सुद्धा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

सर्वच महिन्याला आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.परंतु अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आनंदाचा शिधा वाटप बंद करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा वाटप बंद झाले आहे. याचा मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोठा तोटा होत आहे. आनंदाचा शिधा सोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून बीपीएल कुटुंबांना अर्थातच अंत्योदय कार्ड धारक कुटुंबांना एक साडी देण्याची देखील योजना जाहीर करण्यात आली होती.

यानुसार अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटप सुरू देखील झाले. मात्र आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर साडी वाटपाची योजना देखील गुंडाळण्यात आली आहे.

यामुळे आता आनंदाचा शिधा आणि अंत्योदय रेशन कार्ड धारकांना दिली जाणारे साडी केव्हा मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक, आनंदाचा शिधा आणि साडी वाटप बंद करण्याचे आदेश शासनाकडून निर्गमित झालेले आहेत.

कारण की, महाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिकाधारकांना आनंदाच्या शिधा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या संच्याच्या पिशवीवर पंतप्रधानांचे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांचे छायाचित्र छापले गेले आहे.साहजिकच हा विषय आचारसंहितेत बसणारा नाहीये. त्यामुळे आचारसंहिता लागू होताच शिधा वाटप बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

यामुळे आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच आनंदाचा शिधा योजना सुरू होईल अशी शक्यता आहे. म्हणजेच चार जून 2024 नंतरच या योजनेची पुन्हा एकदा सुरवात होईल अन सर्वसामान्य गरजवंत शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे.