महायुतीमधीलच ‘या’ पक्षाचा प्रमुख निलेश लंके यांना बळ पुरवण्याच्या तयारीत ? महायुतीत खळबळ

Published on -

Ahmednagar Politics : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे त्यांच्या रोखठोक शैलीमुळे सर्वपरिचित आहेत. सध्या ते महायुतीचा घटक असूनही अनेकदा काही गोष्टींवरून ते महायुतीलाच घरचा आहेर देताना दिसले. परंतु आता लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. असे असले तरी बच्चू कडू हे महायुतीच्याच उमेदवारांवर आग ओकताना दिसत आहेत.

अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर आता ते अहमदनगर लोकसभा मतदार संघात महायुतीला धक्का देण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या मागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे एक सूचक वक्तव्य केले त्यामुळे या चर्चाना अधिक ऊत आला आहे.

नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
सध्या लोकसभेच्या अनुशंघाने बच्चू कडू प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून त्यातून स्थानिक परिस्थिती कशी आहे ते समजून घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काहीजण सांगत आहेत की निलेश लंके चांगले आहेत. स्थानिक राजकारणात पक्षाचे नेते विखे घराण्याला विरोध करताना दिसतात त्यामुळेच कदाचित लंके चांगले आहेत,

असं मला कार्यकर्ते सांगतायत काय हे पाहावे लागेल. त्यामुळे सगळा विचार करून आम्हाला एका निर्णयापर्यंत जावं लागणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर
प्रहारचे कार्यकर्ते निलेश लंके यांचा प्रचार करताना दिसतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहमदनगरमध्ये महायुतीला धक्का बसेल?
तस पाहिलं तर त्यांचे ते अद्याप स्टेटमेंटच आहे. त्यांनी लंके यांना पाठिंबा देण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने महायुतीला धक्का बसेल या चर्चाच आहेत. पण ते झाल्यास अहमदनगरमध्ये महायुतीला धक्का बसेल हे मात्र नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe