Ahmednagar News : काल सोमवारी (दि.१) आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात काही अंशी कपात झाल्याने हॉटेल व्यवसाविकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. नव्या आर्थिक वर्षातील काल पहिला दिवस होता.
या दिवशी कोणती गोष्ट महाग होते आणि कोणत्या वस्तूचे दर कमी होतात. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांना काल महागाईतून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र घरगुती गॅसचे दर चढेच आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३० ते ३२ रूपयांची कपात झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे घरगुती १४.२ किलोचा गॅस सिलेंडर आहे. त्याच दरात मिळणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमती सरकारने कमी केली आहे. यामुळे १९ किलो गॅस सिलेंडरच्या किंमती ३० ते ३२ रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. तर दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या आढावा घेतात
आगामी लोकसभा निवडणूकांच्या दरम्यान एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी काल (दि.१) एप्रिलमला तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र ही कपात फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडर करण्यात आली. मात्र घरगूती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत.
यापूर्वी १९ किलोचा एलपीजी सिलिंडर १७९० रुपयांना मिळत होता. तो आता ३० ते ३२ रूपयांची कपात झाली आहे.
सध्या २५ ते ३० रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहे. तसेच गेल्या महिन्यात घरगुती गॅसचे दर १०० रूपयांनी कमी झाले होते. त्यामुळे ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार असला, तरी गॅसच्या दरात चढउतार सुरूच असते. दरात काहीशी कपात झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळेल. मात्र घरगुती गॅसच्या दरात सध्यातरी कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर ८२० रुपयांना मिळणार आहे. – अमोल जोशी, भारत गॅस विक्रेते, श्रीरामपूर
गॅसचा भडका तीन महिन्यानंतर कमी
गेल्या तीन महिन्यात तीन देळा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात भडका उडाला होता. यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले होते. तर तावत्यादरामले दरामुळे ते हैराण झाले होते. महिन्यात १.५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा यात १४रूपये आणि मार्च महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ झाली होती.
मात्र आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडातर व्यावसागिक गॅससिलेंडरच्या दरात तब्बल ३३ ते ३२रूपयांची कपात झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना काहिसा दिलासा मिळणार आहे.