Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंसाठी वातावरण कसे ? नगर शहर व पारनेर कसा ठरेल टर्निंग पॉईंट? पाहुयात महत्वपूर्ण माहिती…

Published on -

Ahmednagar Politics : लोकसभेसाठी आता खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरु झाली आहे. अहमदनगर लोकसभेच्या रिंगणात आता विद्यमान भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व शरद पवार गटाकडून निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात सामना रंगला आहे. दरम्यान आता अहमदनगर लोकसभेचा आढावा घेतला तर ही लढत तशी खूपच कांटे की टक्कर होणार असे जाणकार सांगतात.

विखे पाटील असो किंवा लंके असोत दोघांनाही तितकीच मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही. दरम्यान खा. सुजय विखे यांच्यासाठी अनेक ठिकाणी वातावरण अनुकूल असल्याचे जाणकार सांगत आहेत. तर अनेक ठिकाणी टाईट फाईट होईल असेही लोक म्हणत आहेत.

नगर शहर व पारनेर असेल महत्वपूर्ण
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नगर शहर व पारनेर या दोन्ही ठिकाणी कुणाला लीड कसे राहील यावर अनेक गणिते अवलंबून राहतील असे म्हटले जात आहे. नगर शहर व केडगाव मधील अनेक नगरसेवक कि ज्यात काँग्रेसचे देखील काही नगरसेवक विखे यांचा प्रचार करतील असे म्हटले जात आहे. तसेच विखे यांना कर्डीले- जगताप यांची साथ मिळेल. तसेच महायुतीमधील घटक पक्षांनीही ताकद त्यांना मिळेल असे सांगतिले जात आहे.

येथे त्यांच्या जमेच्या बाजू दिसतात. परंतु येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व कोरोनाकाळातील कामाच्या माध्यमातून लंके यांचा तितकाच वोट बँक असेल असेही म्हटले जाते. तसेच पारनेर हा लंके यांचा तालुका असल्याने त्यांना येथे चान्स जास्त असल्याचे म्हटले असले तरी अनेक जाणकार सांगतात की येथे विखे यांची पकड अनेक दशकापासून आहे. त्यामुळे ज्याचे प्राबल्य जास्त राहील त्यांचा नक्कीच विजयावर परिणाम होईल असे म्हटले जाते.

सगेसोयरे फॅक्टर
सगेसोयरे फॅक्टर देखील महत्वाचा आहे. कर्डीले-जगताप यांचे नातेसंबंध विखे यांचे काम करतील यात शंका नाही. परंतु आ. बाळासाहेब थोरात यांचे सगेसोयरे हे लंके यांचे काम करतील का? वैयक्तिक थोरात किंवा नातेवाईक असते तर मदत केली असती पण लंके यांच्या साठी थेट विखे यांच्याशी पंगा ते घेतील का? याविषयी मात्र शंका असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

ग्रामीण भागातील पकड
ग्रामीण भागातील मतदार संघात मात्र अनेक गोष्टींवर मतदान अवलंबून असेल. विविध समस्या, मतदारांविषयी कनेक्टिव्हीटी, नाराज असणारे वोटिंग यावर दोन्ही उमेदवारांची गणिते अवलंबून आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe