टेम्पोने धडक दिल्याने महिला ठार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यात सदर महिला ठार झाल्याची संगमनेर शहरा लगतच्या खांडगाव फाट्याजवळ नुकतीच घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगीता बाळू गायकवाड (रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत) ही महिला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन महामार्ग ओलांडत होती. रस्ता ओलांडत असताना

संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका पांढ-या रंगाच्या (एमएच १४ केक्यू २२८०) क्रमांकाच्या टेम्पोने सदर महिलेला धडक दिली. या अपघातात सदर महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला होता.

अपघातामध्ये मयत झालेली महिला ही संगमनेरात मजूरीचे काम करत होती. ती कुटुंबासह संगमनेर येथे राहत होती. या अपघाताबाबत काळु बाबु फुलमाळी (रा. निमगाव) गांगर्डा यांनी काल मंगळवारी (दि.३) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe