iPhone : मोबाईल मार्केटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्टीत कपंनी ऍपल सध्या मार्केटमध्ये स्वस्त फोन आणण्याची तयारी करत आहे. नुकतीच एक लीक समोर आली आहे, त्यानुसार कपंनी आता सामान्य ग्राहकांना परवडेल असा फोन आणत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप डिवाइसच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, फोनच्या लीक आणि रेंडरमुळे यूजर्समध्ये उत्सुकता खूप वाढली आहे. नवीनतम लीकमध्ये, एका टिपस्टरने या आगामी आयफोनचे काही फोटो शेअर केले आहेत. यावरून फोनच्या डिझाईनबद्दल बरेच काही समोर येत आहे.

कंपनीचा हा फोन iPhone SE 4 असणार आहे. या फोनमध्ये नॉच डिस्प्ले देण्यात येणार आहे. यामध्ये आयफोन 13 सीरीज प्रमाणेच सेल्फी कॅमेरा आणि फेस आयडी सेन्सर पाहायला मिळेल. लीकवरून असा अंदाज लावला जात आहे की कंपनी iPhone SE 4 मध्ये होम बटण आणि टच आयडी देणार नाही. त्याऐवजी कंपनी नवीन आयफोनमध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी फेस आयडी तंत्रज्ञान देऊ शकते.
रेंडर्सनुसार, तुम्हाला फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सिंगल कॅमेरा सेटअप दिसेल. हा कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असू शकतो. कॅमेरा व्यतिरिक्त येथे मायक्रोफोन देखील देण्यात आला आहे. फोनची रचना वापरकर्त्यांना iPhone X ची आठवण करून देऊ शकते. लीकवरून असेही दिसून आले आहे की फोनच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, एक कटआउट देखील उपस्थित आहे, जे ॲक्शन बटण असू शकते.
मागील लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की कंपनी या फोनमध्ये BOE चा 6.1 इंच OLED डिस्प्ले देणार आहे. हे कंपनीच्या 5G मॉडेम चिप आणि USB Type-C पोर्टसह येईल. iPhone SE 4 बद्दल सध्या फारशी माहिती समोर आलेली नाही. लॉन्चच्या तारखेबद्दल असे सांगितले जात आहे की कंपनी हा फोन पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये बाजारात आणू शकते.