Ahmednagar News : कर्जदारांच्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर ! राजे शिवाजी पतसंस्थेमधील प्रकार, आझाद ठुबेंसह चौघांवर गुन्हा

Published on -

 Ahmednagar News : जमीनीच्या इसार पावतीसाठी घेतलेले मुद्रांक कर्जाच्या वसुली प्रतिज्ञालेखासाठी वापरले. त्यावरून तब्बल १२ कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर जमा केली. हा प्रकार राजे शिवाजी पतसंस्थेत घडला असून तत्कालीन चेअरमन आझाद ठुबे यांच्यासह चौघांवर पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रणजित गणेश पाचर्णे, पोपट बोल्हाजी ढवळे, आझाद प्रभाकर ठुबे व संभाजी मालेकर यांविरोधात गुन्हा दाख ल करण्यात आलाय. हे १२ कर्जदार श्रीगोंदे तालुक्यातील हिंगणी दुमला, गव्हाणेवाडी येथील असून त्यांनी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पारनेर येथील सहायक निबंधक कार्यालयाने या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बारा कर्जदारांचे कर्ज मंजूर करण्यात येऊन रक्कम परस्पर सागर असोसिएट्सच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. या चौकशीत रणजित गणेश पाचर्णे यांनी शपथपत्रावर राजे शिवाजी पतसंस्था, सागर असोसिएटस यांना ओखळत नसून तक्रारदारांच्या कर्जाची रक्कम सागर असोसिएटस यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तसेच तक्रारदारांबाबत आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे, राजे शिवाजी पतसंस्थेचे पद्मधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी आपला कोणताही सबंध नसल्याचे नसल्याचे सांगितले.

सागर असोसिएटसचे पोपट ढवळे यांनी दिलेल्या खुलाशात तक्रारवार शिवाजी चंदर रिकामे व इतर ११ तक्रारदार यांच्यात वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे येथील जमीनीबाबत व्यवहार झाला असून या व्यवहाराची इसार पावती करण्यात आली आहे. या इसार पावतीचा मुद्रांक ढवळे यांनी चौकशी समितीसमोर सादर केला. रणजित पाचर्णे यांना ओळखत नसल्याचेही ढवळे यांनी खुलाशात नमूद केले.

संस्थेचे कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांनी शपथपत्रावर दिलेल्या जबाबात संस्थेचे चेअरमन आझाद दुबे, सागर असोसिएटसचे खातेदार पोपट ढवळे व रणजित पाचर्णे हे एकमेकांना ओळखत असून ढवळे यांच्याकडून संस्थेच्या येणे रकमेसंदर्भात रणजित पाचर्णे यांच्या घरी अनेकदा भेटी झाल्या आहेत,

कर्जदार शिवाजी रिकामे व इतर ११ कर्जदार यांनी मे २०२३ मध्ये १०० रुपयांच्या मुद्रांकशुल्क पेपरवर संस्थेकडे वसुली प्रतिज्ञा लेखाकरीता जमा करून घेतले. चेअरमन आझाद ठुबे यांच्या सांगण्यावरून शेअर्स कपात करण्यात आली नसल्याचे जबाबात नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe