Ahmednagar News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बदल्यांची तयारी सुरू, सेवाज्येष्ठता याद्या करण्याच्या सूचना, ‘अशी’ असणार प्रक्रिया

Published on -

Ahmednagar News : जिल्हा परिषद अर्थात झेडपीला मिनी मंत्रालय असेही म्हणतात. जिल्हा परिषदेचा कामाचा डोलारा मोठा असल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ही नेहमीच चर्चेत असते. त्यामागे विविध पैलू देखील आहेत.

दरम्यान आता यंदाच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरु झालीये. यामध्ये शिक्षकांचा सहभाग नसणार आहे. ते वगळता इतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जोरावर आली आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जूनला लागल्यानंतर या बदल्या होतील.

तयारीच्या सूचना

४ जून नंतर जरी बदल्या होणार असल्या तरी जिल्हा प्रशासनाने बदल्यांची सर्व तयारी करण्याच्या सूचना खातेप्रमुख व सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १४ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बदल्यांबाबतची सर्व पूर्वतयारी करायची आहे. यात कार्यालय प्रमुखांनी १५ ते २१ एप्रिलपर्यंत त्यांच्या स्तरावर संवर्गनिहाय कर्मचारी सेवाज्येष्ठता यादी तयारी करावी. तसेच त्यावर हरकती घेऊन ही यादी अंतिम करावी. २२ एप्रिलपासून २९ एप्रिलपर्यंत अर्जाची कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दिलेले माहिती अद्ययावत करावी व जिल्हा विकल्प, विनंती अर्ज विहीत स्तरावर कागदपत्रांसह खातेप्रमुखाकडे सादर खातेप्रमुखाकडे करावे, ३० एप्रिल रोजी या विकल्प व छाननी करून संवर्गनिहाय माहिती सादर करावी.

सवलत प्रमाणपत्रासाठी २२ एप्रिलपर्यंत मुदत

दिव्यांग किंवा इतर प्राधान्य संवर्गातील कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्राची प्रत २२ एप्रिलपर्यंत खातेप्रमुख किंवा कार्यालयप्रमुखांकडे सादर करायची आहे. दि. २२ नंतर आलेले पुरावे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची अधिकाऱ्यांनी आपल्यास्तरावरच पडताळणी करावी, तसेच प्रशासकीय व विनंती बदलीतून सूट घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी. पडताळणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. बदलीबाबत काही तक्रारी उ‌द्भवल्यास संबंधित खातेप्रमुख जबाबदार राहतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बदली प्रक्रियेतील महत्वपूर्ण तारखा

■ सेवाज्येष्ठता यादी तयार करणे : १५ एप्रिल २०२४

■ बदलीसाठी विकल्प, विनंती अर्ज सादर करणे : २२ एप्रिल २०२४

■ विकल्प, विनंती अर्ज छाननी : ३० एप्रिल २०२४

■ प्रारूप ज्येष्ठता यादी जि. प. संकेतस्थळावर प्रसिद्ध : ७ मे २०२४ अखेर

■ ज्येष्ठता यादीवर हरकती, आक्षेप घेणे : १३ मे २०२४

■ हरकतींचे निराकरण करून अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे : १५ मे २०२४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News