Fixed Deposit : भारतीय ग्राहक अजूनही त्यांची बचत अशा ठिकाणी गुंतवण्यास प्राधान्य देतात, जिथे त्यांना सुरक्षितता मिळेल. म्हणूनच आज जवळ-जवळ भारतातील सर्व नागरिक एफडी मध्ये गुंतवणूक करताना दिसतात. एफडी मधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तसेच तुम्हाला येथे उत्तम परतावा देखील मिळतो.
दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या 3 वर्षांच्या FD वर बक्कळ परतावा ऑफर करत आहेत, या बँका मागील काही ग्राहकांना श्रीमंत बनवत आहेत. कोणत्या आहेत या बँका आणि एफडीवर किती व्याज देतात पाहुयात…
एसबीएम बँक
SBM बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 8.10 टक्के व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी 8.60 टक्के पर्यंत व्याज देत आहे.
डीसीबी बँक
DCB बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 8% व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.50 टक्के व्याज देत आहे.
येस बँक
येस बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे तर त्याच कालावधीत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.25 टक्के व्याज देत आहे.
ड्यूश बँक
ड्यूश बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांसाठी FD वर 7.75 टक्के व्याज देत आहे तर त्याच कालावधीसाठी त्यांच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के व्याज देखील देत आहे.
इंडसइंड बँक
IndusInd बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 3 वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देत आहे. तर बँक आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना याच कालावधीसाठी जास्तीत जास्त 8 टक्के व्याज देत आहे.