Benefits of Almonds milk : बदामाचे दूध आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या रोज पिण्याचे फायदे!

Published on -

Benefits of Almonds milk : दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच. पण तुम्हाला हे माहिती आहे का? दुधात बदाम मिसळून पिणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते.

फक्त एक ग्लास बदामाचे दूध तुमचा दिवस चांगला आणि उत्साही बनवू शकते. इतकंच नाही तर बदामाच्या दुधात आवश्यक व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

दुधात कॅलरीजचे प्रमाणही जास्त नसते. अशास्थितीत बदामाचे दूध हे अँटिऑक्सिडंट्स आणि हृदय-निरोगी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. दररोज बदामाचे दूध प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि पोषणही मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. आज आपण बदाम दुधाचे सविस्तर फायदे जाणून घेणार आहोत…

बदाम दुधाचे फायदे!

-‘व्हिटॅमिन ई’चे नैसर्गिक स्रोत बदामाच्या दुधात आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर आहे. बदामाच्या दुधात अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ते अल्झायमरसारखे आजार कमी करते असे मानले जाते.

-तसेच बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात असलेले मॅग्नेशियम डीएनए, रक्तदाब, हाडे, प्रथिने आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते.

-बदाम हा आहारातील फायबरचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो पचायला बराच वेळ लागतो. स्नॅकिंगसाठी हे एक उत्तम नट आहेत. त्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉलही कमी असते.

-तसेच बदाम दुधाचे सेवन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.

-बदामाचे दुधाचे सेवन डोळांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe