Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंच्या प्रचारार्थ आता खुद्द पालकमंत्र्यांसह प्रदेशमंत्री उतरणार आखाड्यात ! जिल्हाध्यक्षांची माहिती, भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्यावरही भाष्य

Ahmednagarlive24 office
Published:
vikhe

Ahmednagar Politics : भाजपने खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे. प्रत्येक वार्डनुसार बैठका, चर्चा, प्रचार सुरु आहे. विखे यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले.

अहमदनगर येथे मंगळवार (दि.१६ एप्रिल) भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की, येत्या २०, २१ तारखेला प्रदेश मंत्री विजय चौधरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील सर्वच सहा मतदार संघात हा दौरा असेल. यावेळी सर्व सामान्यांशी भेटीगाठी करत खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ काम केले जाईल असे भालसिंग यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, भाजपचे प्रदेशचे प्रदेश सचिव अरुण मुंडे आदींसह अनेक भाजप पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी अहमदनगरमधील अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्याने अहमदनगरची जागा भाजप गमावणार असल्याचा आरोप करत मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे सादर केले. याविषयी त्यांना विचारणा केली असता, यावर जास्त बोलणे टाळले.

त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, हे राजीनामा पत्र काय आहे, हे आम्हीच अजून पाहिलेले नाही. सध्या सोशल मीडियावरच हे पत्र आम्ही पाहिले आहे. या पत्राची शहानिशा करून खुलासा करू असे भालसिंग यावेळी म्हणाले.

अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांना देखील यावेळी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, शेवगाव पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. याबाबत आपण बोलणे उचित होणार नाही असे ते म्हणाले.

भाजप कारवाई करणार असल्याने राजीनामा?
सुनील रासने हे मागील सहा महिन्यांपासून निलेश लंके यांच्यासोबत फिरत होते. ते राष्ट्रवादीचा प्रचार करत होते. त्यामुळे भाजप पक्ष हा त्यांच्यावर कारवाई करण्याच्या विचारात असतानाच त्यांनी ही कारवाई होण्याआधीच आपला राजीनामा देण्याचे नाटक केले असल्याचे विखे समर्थक बोलत आहेत.

रासने-लंके हे सोबत असल्याचे फोटोही विखे समर्थक सोशल मीडियावर व्हायरल करत होते. मागील सहा महिन्यापासून लंके यांच्यासोबत फिरणाऱ्या रासने यांना पक्ष कसा आठवला नाही असा सवालही विखे समर्थक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe