लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचणार आहे. एकीकडे उष्णतेमुळे वातावरण प्रचंड तापायला सुरवात झाली आहे. त्यात निवडणुकीच्या फीव्हरमुळे राजकीय रणांगण तापणार आहे.
महायुती, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाकडून आता ठिकठिकाणी सभा, रॅली आणि बैठकांचे आयोजन सुरु आहे. पक्षाच्या महत्वपूर्ण नेत्यांचे दौरे सुरु आहेत सभा सुरू आहेत. यात आता शरद पवार देखील उतरणार आहेत. त्यांचे वय पाहता ते किती सभा घेतील याबद्दल अनेकांना उत्सुकता होती.
पण आता त्यांच्या सभांची यादीच समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार महाराष्ट्रभर मॅरेथॉन दौरा करणार असून २२ दिवसांमध्ये तब्बल ५० सभा ते घेणार आहेत.
मागील विधानसभेला शरद पवार यांच्या सभेतील ताकद व युवा वर्गाशी झालेली अटॅचमेंट सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांआधी ते जय सभा घेतील याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होईल तर जवळपास ११ मे पर्यंत हा सभांचा धडाका सुरु राहील.
असा असेल शरद पवारांच्या सभांचा धडाका
१८ एप्रिल – बारामती, शिरुर, मावळ, पुणे लोकसभा मतदार संघ नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभा होईल
२० एप्रिल – दिंडोरीसाठी मनमाड येथे तर रावेरसाठी चोपडा येथे जाहीर सभा
२१ एप्रिल – रावेरसाठी रावेर येथे तर वर्धासाठी मोर्शी येथे जाहीर सभा
२२ एप्रिल – वर्धासाठी हिंगणघाट येथे जाहीर सभा
२३ एप्रिल – रायगडसाठी अलिबाग येथे जाहीर सभा
२४ एप्रिल – माढासाठी कुडूवाडी येथे तर सातारासाठी वाई येथे व बारामतीसाठी भोर येथे जाहीर सभा
२५ एप्रिल – अहमदनगरसाठी शेवगाव येथे सभेचे आयोजन तर बीडसाठी माजलगाव, बारमतीसाठी दौंड येथे जाहीर सभा
२६ एप्रिल – माढासाठी करमाळा/टेंभूर्णी येथे, माढासाठी सांगोला येथे त्याच दिवशी माढासाठीच पंढरपूर येथे जाहीर सभा
२७ एप्रिल – माढासाठी दहिवडी येथे जाहीर सभा
२८ एप्रिल – शिरूरसाठी उरळी कांचन येथे, अहमदनगरसाठी श्रीगोंदा येथे तर बारामतीसाठी सासवड येथे सभा
२९ एप्रिल – सातारासाठी कोरेगाव येथे तर बारामतीसाठी वारजे येथे जाहीर सभा
३० एप्रिल – माढासाठी फलटण येथे तर सातारासाठी पाटण येथे सभेचे आयोजण
१ मे – रावेरसाठी जामनेर, मुक्ताईनगर येथे व औरंगाबादसाठी औरंगाबाद येथे जाहीर सभा
२ मे – अहमदनगरसाठी राहुरी येथे व त्याचदिवशी बारामतीसाठी नीरा येथे जाहीर सभा
३ मे – सातारासाठी कराड तर कोल्हापूरसाठी कोल्हापूर येथे जाहीर सभा
४ मे – सातारासाठी सातारा येथे जाहीर सभेचे आयोजन
५ मे – बारामतीसाठी इंदापूर व बारामती येथे जाहीर सभा
६ मे – शिरूरसाठी शिवगोरक्ष मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन
८ मे – रावेरसाठी रांजणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन
९ मे – अहमदनगरसाठी पारनेर येथे आणि त्याच दिवशी बीडसाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन
१० मे – शिरूर लोकसभासाठी चाकण येथे आणि पुणे येथे सभेच अयोज़न
११ मे – बीडसाठी अंबेजोगाई येथे त्याचदिवशी दिवशी अहमदनगरसाठी अहमदनगर येथे महाविकास आघाडीची सभेचे आयोजन