Stocks to Buy : इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गेल्या ३ दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. या तीन दिवसात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 7.93 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. मोठ्या कंपन्यांपासून ते लहान-मध्यम कंपन्यांपर्यंतच्या शेअर्समुळे त्यांच्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले, परंतु काही कंपन्या अशा होत्या ज्यांच्या शेअर्समुळे त्यांचे गुंतवणूकदार श्रीमंत झाले.
यातील पहिले नाव म्हणजे Puravankara आहे. या शेअरने या दिवसात 26 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मंगळवारी Puravankara यांचा शेअर्समध्ये ४.९१ टक्क्यांच्या उसळीसह ३७२.३० रुपयांवर बंद झाला. एका महिन्यात यात 90 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक 379 रुपये आणि नीचांकी 75.10 रुपये आहे.

यादीत दुसरे नाव सेन्को गोल्डचे आहे, ज्याने सुमारे 26 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीचे शेअर्स आता 987.80 रुपयांवर आहेत. या शेअरने गेल्या एका महिन्यात सुमारे 35 टक्के परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1066.50 रुपये आहे आणि नीच्चांक 358.45 आहे.
या यादीत न्यूलँड लॅब्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन दिवसांत या शेअरमध्ये 21 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी हा शेअर 6 टक्क्यांहून अधिक वाढून 7529.70 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 7610 रुपये आणि नीच्चांक1950 रुपये आहे.
शेअर बाजारातील घसरण मंगळवारीही कायम राहिली. सेन्सेक्स 456.10 अंकांनी घसरून 72,943.68 अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान तो 714.75 अंकांवर घसरला होता.