माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे, तुमच्याकडे काय आहे ? डॉ. सुजय विखे पाटील यांचा विरोधकांवर घणाघात

Published on -

आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे मतदार संघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू अशा परखड शब्दांत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील विरोधकांचा समाचार घेतला. ते राहुरी येथिल एका सभेत बोलत होते.

नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. प्रचारात आघाडीवर असेलेले महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या समर्थात ठिक ठिकाणी रॅली, सभा भरविल्या जात आहेत. त्यांच्या सभांना वाढत्या गर्दीने विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सुजय विखे पाटील म्हणाले की, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली असून विरोधात कोण आहे? याचा विचार केला नसून कोणावरही टिका टिप्पणी केली नाही. केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मैदानात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आले असून, जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षिमिकरण करणे, जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यांचे हात भष्ट्राचाराने बरबटले आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत. सामान्य जतना वैतागली असताना केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचे खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिले.

मतदार संघात सुजय विखे यांच्या प्रचार सभां लोकांची गर्दी खेचत आहेत. केवळ विकास कामांचे मुद्दे घेऊन रिंगणात आलेले सुजय विखे पाटील यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे. तरूण त्यांना विळखा घालून सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News