अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगरसह ‘या’ 24 जिल्ह्यात पावसाची शक्यता ! येलो अलर्ट जारी

Published on -

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान या ऊन-पावसाच्या खेळात राज्यातील शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडत आहे. काल अर्थातच शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाचा पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील हार्वेस्टिंग साठी तयार झालेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान आज अर्थातच 21 एप्रिल 2024 ला राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तथा कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये वळवाचा पाऊस पडणार अशी शक्यता तयार होत आहे.

यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान हवामान खात्याने मंगळवार पर्यंत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग कायम राहू शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.

आज कुठे बरसणार वादळी पाऊस

आज 21 एप्रिल रोजी राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील दिला आहे.

राज्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले आहे.

तसेच, दक्षिण कर्नाटक, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे. या हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी पाऊस आणि गारपीट होत आहे.

आज राजधानी मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.

याशिवाय आज खानदेशातील धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिवाय आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या सदर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe