Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या विजयाची गणिते अद्याप कुणालाच जुळेनात. परंतु खा. सुजय विखे यांचा प्रचाराचा झंजावात मात्र आता वेग घेताना दिसत आहे. यात सध्या जास्त लक्ष व जनमानसाचे लक्ष हे ते म्हणजे पारनेर वर.

याचे कारण म्हणजे हा निलेश लंके यांचा विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांना येथे किती मत मिळतील याचा अंदाज लोक बांधत आहेत. परंतु दुसरीकडे खा. सुजय विखे यांनी पारनेरमध्ये उभी केलेली यंत्रणा, राजकीय नेत्यांची बांधलेली एकत्रित मोट यामुळे विखे तेथे वरचढ ठरतील असेही लोक म्हणत आहेत.

विखे यांची पॉवरफुल राजकीय खेळी

पारनेर मध्ये नीलेश लंके यांचे मताधिक्य रोखण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी शर्थीचे प्रयल सुरू केले आहेत. त्यांनी तालुक्‍यात बैठकांचा धडाका लावला आहे. विखे यांनी पारनेरमध्ये लंके यांचे विरोधक माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, सुजीत झावरे, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्याबरोबर जुळवून त्यांच्या समर्थकांचे मेळावे घेतले आहेत.

झावरे, दाते, औटी, विश्वनाथ कोरडे, राहूल शिंदे, प्रशांत गायकवाड हे सर्व महायुतीकहून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. हे सर्व जण विखे यांच्यासाठी बांधणी करीत आहेत. सुपा एमआयडीसीत व तालुक्‍यात लंके यांची दहशत आहे, असा आरोप ‘विखे करीत आहेत. पारमेर तालुका दहशतमुक्त करू हा त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे.

नंदकुमार झावरे, विजय औटी यांची राजकीय भूमिका गुलदस्त्यात

माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी सभापती राहुल झावरे, ठाकरे सेनेचे माजी आमदार विजय औटी हे कुणाचे काम करतील हे अद्याप कुणालाच समजेना. कारण सध्या त्यांच्या गोटात शांतता आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेऊन प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यानंतर हे सर्व नेते प्रचारात आपली भूमिका मांडतील असा अंदाज आहे. सध्या त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने ते कुणाचे काम करतील यावरून सध्या मतदार विविध तर्कवितर्क काढत आहेत.

लंके देखील कार्यरत

लंके यांनी आपले दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते गावनिहाय सक्रिय केले असल्याचे दिसते. लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देतानाच आपण इतर तालुक्यात प्रचारासाठी जात असून, माझ्या वतीने तुम्ही तालुक्यात बांधणी करा, असे आवाहन लोकांना केले आहे.

त्यांची दुसरी फळी कामाला लागली असल्याचे चित्र आहे. सुपा एमआयडीसी शरद पवारांनी आणली. विखे यांनी सुपा एमआयडीसी व पारनेर तालुक्यासाठी काय केले आदी प्रश्न ते विचारत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe