डीजेच्या दणदणाटात बँडचा मंगलमय गोडवा लुप्त ! कलाकारांवर उपासमारीची वेळ, बॅंड मालकही आर्थिक विवंचनेत, परंपरेला घरघर

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : बँड पथक म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात एकसुरात एका तालात वाद्य वाजवणारी मंडळी. बँड पथकातील वाद्यांना मंगल वाद्ये असेही म्हटले जाते. एक काळ होता की कोणतेही लग्न असो की मंगल कार्य असो बदन पथक ठरलेले असल्याचे.

परंतु काळाच्या ओघात विशेषतः कोरोना काळांनंतर व डीजेच्या लोकप्रियतेनंतर बँडवर अवकाळी कळा आली. लग्न सराईसारखा कमाईचा हंगाम गेल्याने बँड पथकांना अक्षरशः वनवास आल्याचे चित्र आहे.

आता आगामी येणाऱ्या गणेशोत्सव काळातच बँड व्यवसायाचा सूर, ताल, लय जागेवर येईल, अशी आशा बॅंड पथकातील कलावंतांना आहे.

अनेक कलावंत, बँड मालकांवर आर्थिक ताण

अहमदनगर जिल्ह्यात अनेक बॅंडपथके आहेत. साधारण हा आकडा ४०० ते ५०० च्या घरात असेल. काही बँड पथकांना तर शंभराहून अधिक वर्षांची परंपरा आहे. एका बँड पथकात सरासरी २० ते २५ कलावंतांसोबत बँड मालक वर्षभराचा करार करतो.

त्यानुसार ‘वादकाला कायमस्वरूपी दरमहा सरासरी १५ हजार रुपये पगार देतो. गरजनुसार काही बँड पथके वादकांना तासावर मानधन देऊनही बोलावतात. ग्रामीण भागात एका सुपारीमागे १५ ते ३५ हजाराचे मानधन बँड पथकाला मिळते.

यावर त्यांची उपजीविका सुरु असते. परंतु सध्या डीजेच्या दणदणाटापुढे बँडचा आवाज लुप्त होऊ लागला आहे. डीजेला तीन-चार माणसे असली तरी जमतात. त्यामुळे सध्या अनेक कलावंत, बँड मालकांवर आर्थिक ताण पडला आहे.

डीजेमुळे आमचे पारंपरिक बँड पथक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कित्येक वर्षांपासून बॅंड पथकात काम करणार्‍या हजारो कलाकारांची रोजीरोटी धोक्यात आली आहे. बँडवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना उपासमारीचा फटका सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे सरकारने किमान मानधन द्यावे अशी मागणी बँड पथकातील कलावंत करत आहेत.

कलाकारांवर उपासमारीची वेळ

बॅंड पथकाला परंपरा असल्याने अनेक कलावंतांनी यात झोकून देऊन काम केले. त्यांची कला ही अफलातून असते. या कलेच्या माध्यमातूनच हे आपले घर चालवत असतात. परंतु काळाच्या ओघात डीजे असेल किंवा इतर साधने यामुळे बॅंडला घरघर लागल्याचे दिसते. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe