Panjabrao Dakh Havaman Andaj : एप्रिल महिना आता संपण्यावर आला आहे. येत्या तीन दिवसात एप्रिल महिना संपेल. मात्र एप्रिल महिन्याचा शेवट हा देखील अवकाळी पावसाने होणार असे चित्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार असे म्हटले आहे.
हवामान खात्याने आज राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे. तसेच आज मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांचा देखील एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. या नवीन अंदाजात पंजाब रावांनी आणखी किती दिवस वादळी पाऊस सुरू राहणार, तसेच मे महिन्यातील पहिला आठवड्यात हवामान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात आणखी किती दिवस वादळी पावसाचे सावट
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तथा पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
आज 28 एप्रिल आणि उद्या 29 एप्रिल पर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 30 एप्रिल पासून मात्र राज्यातील हवामान कोरडे होणार आहे.
कस राहणार मे च्या पहिल्या आठवड्याच हवामान
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, एक मे पासून राज्यात उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा राज्यात कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीत, एप्रिल महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने होणार आहे. पण पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला वादळी पावसाचे सावट दूर होणार आहे. निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायी राहणार आहे.