Ahmednagar News : सबजेलमध्ये कैद्यांत फिल्मी स्टाईल हाणामारी ! मिशी कापायच्या कात्रीने सपासप वार

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मारहाणीचे अनेक प्रकार सातत्याने घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता थेट सबजेलमधेच कैद्यांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात शुक्रवारी रात्री घडली.

या आधीही जिल्ह्यामधील एका तुरुंगातून कैदी फार होण्याची घटना घडली होती. आता कोपरगावमध्ये थेट मिशी कापायच्या कात्रीने हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी : कोपरगाव येथील सबजेलमधील चार नंबरच्या बराकीत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भैया ऊर्फ नयन शिंदे, भारत आव्हाड, अतुल आव्हाड, आकाश माकोणे, विकी शिदे (सर्व रा. न कोपरगाव), विशाल कोते (रा. शिर्डी) या कैद्यांमध्ये आपसात भांडणे सुरू होती.

त्यावेळी दानिश शेरखान पठाण (वय १९, रा. इंदिरानगर कोपरगाव) हा अन्य कैदी तिथे होता. यावेळी आकाश माकोणे याने दानिशला धक्का देऊन शिवीगाळ केली.

त्यावर दानिश मला विनाकारण शिवीगाळ का करतो? असे म्हणाला. त्यावर सर्व सहा कैदी एकत्र आले. त्यांनी दानिशला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. विशाल कोते याने त्याच्या हातात असलेल्या मिशी कापायच्या बारीक कात्रीने दानिशच्या हाता-पायावर वार केले.

त्यानंतर आम्ही मारहाण केल्याचे पोलिसांना किंवा न्यायालयात सांगितले तर तू परत आल्यावर जिवे मारू, अशी धमकीही दिली. दरम्यान या घट्नेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी सबजेलमध्ये धाव घेतली.

त्यांनी चार नंबरच्या बराकीची पाहणी करत दानिश शेरखान पठाण याच्या फिर्यादीवरून वरील सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News