Ahmednagar Politics : शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवतेंना वंचितकडून उभे करण्यामागे विखे यांचा हात? राजकीय समीकरणे बदलवण्यासाठी खेळी केली?

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील राजकारणात विखे घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. विविध निवडणूक मग त्या आमदारकीच्या असोत की अगदी जिल्हा परिषदेच्या विखे यांच्या राजकीय खेळी सर्वश्रुत असतात. दरम्यान सध्या लोकसभेचा आखाडा तापला आहे.

यात शिर्डीमध्ये महायुतीकडून खा. सदाशिव लोखंडे हे तर महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उभे आहेत. परंतु यात अचानक काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या रुपवते घराण्यातील उत्कर्षा रुपवते यांनी वंचित आघाडीमध्ये प्रवेश करत वंचित कडून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे येथे तिरंगी लढत होईल.

रुपवते यांना उभे करण्यामागे विखे यांची खेळी?
दरम्यान आता उत्कर्षा रुपवते यांना उभे करण्यामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय खेळी असल्याची खमंग चर्चा पारावर बसणारे नागरिक करत आहेत. याचे कारण सांगताना हे लोक म्हणतात की, शिर्डीमध्ये यावेळी सदाशिव लोखंडे यांना विजय मिळवणे वाटते तितके सोपे राहिले नाही.

ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पक्ष श्रेष्ठींनी दिली आहे. त्यामुळे हा विजय सोपा करण्यासाठी महाविकास आघाडीचे मतविभाजन करण्यासाठी विखे यांनी रुपवते यांना उभे राहण्यास सांगितले असावे अशी चर्चा हे लोक करत आहेत. रुपवते उभ्या राहिल्या तर त्या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या असल्याने त्या काँग्रेसची अनेक मते घेतील.

तसेच बहुजन समाजाची मते की जी आजवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मिळत आली ती मते रूपवतेंना मिळतील. पर्यायाने लोखंडे यांचा विजय सोपा होईल असे गणित यामागे असावे असे लोक म्हणत आहेत. त्यातच आता रुपवते यांनी घेतलेली मनोज जरांगे पाटील यांची भेट ही देखील एक राजकीय चाल असावी असे म्हटले जात आहे. अर्थात जी मराठा मते महायुतीवर नाराज आहेत त्या मतांमध्येही विभाजन व्हावे अशीही एक खेळी असावी अशी चर्चा सध्या लोक करतायेत.

चर्चांना आधार काय?
वरील सर्व चर्चा आहेत. चर्चांना आधार नसतो. उत्तरेत विखे यांचे वर्चस्व अबाधित असल्याने ते असे करतील असे वाटत नाही. परंतु ऐन निवडणुकीच्या काळात खमंग चर्चा रंगतच असतात. यातून किती व कसा अर्थ काढायचा हे आपण आपले ठरवायचे असते हे मात्र नक्की…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe