Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता यात्रे दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहरटाकळी येथे घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरटाकळीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

संकेत आपशेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यात्रेत फिरत असताना रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास यात्रेतून ओरडण्याचा आवाज आला. आवाजाचे दिशेने जाऊन पाहिले असता. लक्ष्मी माता मंदिराजवळ अक्षय यास गावातील अजय दाविद कोल्हे सुरीने,

किरण उत्तम चव्हाण सत्तुरने, पंकज लक्ष्मण कोल्हे फायटरने, अविनाश साईनाथ पवार लोखंडी रॉडने, विकास संजय कोल्हे काठीने तसेच तीन ते चार अनोळखी व्यक्ती मारहाण करत होते. फिर्यादी व त्याचा चुलतभाऊ आल्याचे पाहून मारहाण करणारे पळून गेले.

शेवगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना अक्षयने म्हणाले, वरील युवकांनी मागील किरकोळ भांडणाचा मनात राग धरुन मारहाण केल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून इता आरोपी फरार आहे. पोलिस आरोपी पकडत नाही, तोपर्यंत गाव बंद राहील. आश्वासन नको कारवाई हवी, अशा शब्दात संतप्त गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाहीतर उद्या तालुकाही बंद ठेवू, असा इशारा कृष्णा गवळी यांनी दिला.