असे ही प्रेम! लॉकडाऊनमध्ये मुलीचा ड्रेस घालून प्रियकर पोहोचला प्रेमिकेजवळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-कोरोनाने देशभरात थैमान घातल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद असल्याने अनेक लोक अडकले आहेत.

अशात प्रेमी जोडप्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. परंतू एका पठ्ठ्याणे यावर मात करत मुलीचा ड्रेस घातला आणि भेटायला गेला व पोलिसांच्या कचाट्यात सापडला.

गुजरातच्या वलसाडमध्ये या तरूणानं आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क मुलीचा ड्रेस घातला पण त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

19 वर्षीय मुलाला वाटले की रात्री पोलिस मुलींची चौकशी करत नाही म्हणून त्याने पंजाबी ड्रेस घातला आणि ओढणी डोक्यावर घेऊन रात्री तीन वाजेच्या सुमारास बाहेर पडला.

रात्री गस्त घालताना पोलिसांना त्याला पाहिलं. तेव्हा तोंड लपवत असलेल्या तरुणाने पोलिसांना काही उत्तर दिले नाही तेव्हा त्याची पोलखोल झाली.

ओढणी काढल्यानंतर हा मुलगा असल्याचं पाहून पोलीस कर्मचारीही चक्रावले. या घटनेनंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment