महाराष्ट्रात आजपासून वादळी पावसाचा कहर सुरु होणार ! पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, कुठं-कुठं पूर्वमोसमी पाऊस पडणार ? वाचा….

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : नुकत्याच काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केला होता. Monsoon 2024 मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते. डख यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो.

गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. यंदा मात्र उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

डख यांनी यंदा 22 मे ला मान्सूनचे अंदमानत आगमन होणार अन महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे. मात्र राज्यात पेरणीयोग्य पावसाला 22 जून नंतर सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे.

25 ते 27 जून दरम्यान महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस होईल आणि जुनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत पंजाबरावांनी यावर्षी खूपच चांगला मान्सून राहणार असा अंदाज दिला आहे.

तत्पूर्वी मात्र राज्यात पूर्व मौसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच 7 मे 2024 पासून ते 11 मे 2024 पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पूर्व मौसमी पाऊस पाहायला मिळू शकतो.

या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भात गारपीट होण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यामुळे साहजिकच राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तथापि ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असे मत जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

दरम्यान राज्यात पूर्व मौसमी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने या पावसामुळे उकाड्याने हैराण जनतेला काहीसा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe