Ahmednagar News : अहमदनगरमधील कारखान्यांनी थकवली ३९२ कोटींची एफआरपी ! शेतकऱ्यांचे गणित कोलमडले, कारखानदारांचे केंद्र सरकारकडे बोट

Published on -

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा. सहकाराची सुरवात नगरमधीलच. साखर कारखान्यांमुळे शेतकरी व उसउत्पादकांचे आर्थिक गणित सुस्थितीत ठेवले.

पण आता यंदा जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३९२ कोटी रुपयांची एफआरपी थकवली असल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही कारखान्यांनी फेब्रुवारीमध्ये तोडणी केलेल्या उसाचे पैसे अद्यापही अदा केलेले नाहीत.

त्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्यात जमा आहे. मागील दोन हंगाम साखर कारखानदारीसाठी चांगले ठरले होते. कच्ची साखर तसेच इथेनॉलच्या बंपर उत्पादनामुळे कारखाने सुस्थितीत आले होते.

त्यामुळे एफआरपी चुकविण्यात अडचण आली नव्हती. यंदा मात्र सर्वच गणित कोलमडल्याचे चित्र आहे. खासगी व सहकारातील दहा कारखान्यांनी ३० ते ७० कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे.

तीन ते चार महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना कारखान्यांकडील पैशांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या कारखान्यांना नोटिसा बजावत सुनावणी घेतली आहे. ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविल्यास आरआरसीची कारवाई केली जाते.

महसुलाची थकबाकी समजून कारखान्यांच्या मालमत्तांवर त्यानुसार टाच आणली जाऊ शकते. साखर विक्रीतून शेतकऱ्यांची देणी महिनाभरात देण्याचा कारखान्यांचा प्रयत्न आहे.

महायुतीचे नेते आपल्याच सरकारला फाटकारतायेत..
केंद्राने चालू गळीत हंगामात साखरेचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करत बीहेवी ज्यूसपासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती. केवळ सीहेवीपासून इथेनॉल उत्पादनाला परवानगी देण्यात आली.

त्यामुळे साखरेच्या उत्पादनात वाढ होऊन दर कमी झाले. इथेनॉलचे पैसे हे कारखान्यांना अल्पावधीत उपलब्ध होतात. साखर विक्रीचा कोटा मात्र सरकारकडून निश्चित केला जातो. राज्य सरकारमधील जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी त्यावरून सरकारला घरचा अहेर दिला आहे.

कुणाची किती थकली एफआरपी?
अगस्ती : २८ कोटी
अशोक : ३० कोटी
ज्ञानेश्वर : ८४ कोटी
कुकडी : ३६ कोटी
गणेश : १४ कोटी
मुळा : ४५ कोटी
वृद्धेश्वर : ३६ कोटी
केदारेश्वर : ३४
गंगामाई : ६७ कोटी

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News