लग्नसराई व राजकीय सभांमुळे फुलांच्या दरात वाढ ! गुलाब, झेंडूची मागणी असूनही भाव स्थिर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्ह्यासह सर्वत्रच सध्या लग्नसराई व निवडणुकीची धामधूम एकत्रच सुरु आहे. विशेष म्हणजे या दोन्हींसाठी फुलांची मागणी असते. त्यामुळे सध्या फुलाला मागणी असून भाव देखील समाधानकारक मिळत आहे.

लगीनसराईला ब्रेक लागल्याने फुलांच्या भावात चढ-उतार होताना दिसून येत आहे. चढ-उतार फूल उत्पादकांच्या फायद्यात ठरत आहे. गुलाबाचे भाव स्थिर असून इतर फुलांच्या भावात चढ-उतार सुरू आहे.

नगर शहरातील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून फुलांची चांगली आवक होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी फुलांची आवक कमी दिसून येत असून, भावात तेजी दिसून येत आहे.

लग्नसराईची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे लग्नसमारंभात सजावट करण्यासाठी फुलांना मागणी वाढलेली आहे. त्यामुळे भावातही वाढ झालेली आहे. सध्या निवडणुकीमुळेही फुलांनी भाव खाल्लेला आहे.

निवडणुकीच्या अगोदर नेत्यांचे स्वागत पुष्पवृष्टी करून केले जात होते. तेव्हा तर फुलांना प्रचंड मागणी वाढलेली आहे. आता फुलांची मागणी कमी झालेली असली, तरी नेहमीपेक्षा राजकीय पक्षांकडून मागणी कायम आहे. सध्या गुलाबाला मागणी दिसून येत आहे. मात्र, भाव स्थिर आहे. टाकुयात एक नजर भावावर..

४ मे
फूल                 भाव
गुलाब               २० ते ३०
गुलछडी            १५ ते ३०
झेडू                  ४ ते १०
शेवंती               २० ते ३५
अष्टर                साडेबारा ते १५

३ मे
फूल                  भाव
गुलाब               १५ ते ३०
गुलछडी           २० ते ३०
झेडू                 ३  ते १०
शेवंती              १५ ते ३५
अष्टर               १० ते १५

२ मे
फूल                  भाव
गुलाब               २० ते ३०
गुलछडी           २० ते ३५
झेडू                  ३  ते १०
शेवंती               १८ ते ३५
अष्टर                ११ ते १५