Tata Nexon चे स्वस्त व्हेरियंट भारतामध्ये लॉन्च,कमी किमतीत मिळतील खूपच फीचर्स! महिंद्रा XUV 3XO ला देईल कडवी स्पर्धा

Published on -

Tata Nexon : टाटा मोटर्स देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय कार बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत. यामध्ये अनेक नवीन एन्ट्री लेवल व्हेरियंट असून परवडणाऱ्या किमतींमध्ये बाजारपेठेत सादर करण्यात आलेले आहेत.

टाटा मोटर्सच्या बऱ्याच कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय असून त्यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटाची एसयूव्ही Nexon हि होय. काल म्हणजेच अकरा मे 2024 रोजी टाटा मोटर्सच्या माध्यमातून भारतात या लोकप्रिय एसयूव्ही नेक्सन कारचे नवीन एंट्री लेवल व्हेरीएंट लॉन्च करण्यात आलेले आहे. या नवीन वेरियंटमध्ये पेट्रोल मॉडेल मधील स्मार्ट(O) प्रकार आणि डिझेल मॉडेल्स मधील स्मार्ट+ आणि स्मार्ट+ एस प्रकाराचा समावेश आहे.

टाटा मोटर्सने लॉन्च केले एसयुव्ही नेक्सनचे नवीन एंट्री लेव्हल व्हेरियंट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या टाटा मोटर्स या कंपनीने काल 11 मे 2024 रोजी भारतात लोकप्रिय अशा एसयूव्ही नेक्सनचे नवीन एन्ट्री लेवल व्हेरियंट लॉन्च केले असून

यामध्ये पेट्रोल मॉडेल मधील स्मार्ट(O) प्रकार आणि डिझेल मॉडेल्स मधील स्मार्ट+ आणि स्मार्ट+ एस प्रकाराचा समावेश करण्यात आला असून ही कार महिंद्राची नुकतीच लॉन्च झालेली XUV 3XO या कारला तगडी टक्कर देईल असे म्हटले जात आहे.

किती आहे किंमत?

या नवीन व्हेरीएंट मधील स्मार्ट(O) पेट्रोल कारची किंमत सात लाख 99 हजार रुपये तर डिझेल इंजिन पर्यायसह स्मार्ट+ ची किंमत नऊ लाख 99 रुपये आहे तर यासोबत डिझेल इंजन पर्यासह स्मार्ट+ S या व्हेरिएंटची किंमत दहा लाख 59 हजार रुपये आहे.

या सर्व किमती एक्स शोरूम किमती आहेत. जर आपण मागील स्मार्टच्या तुलनेत बेस पेट्रोल व्हेरियंटचा विचार केला तर पंधरा हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे तर स्मार्ट+ तीस हजार रुपयांनी आणि स्मार्ट+ एस व्हेरियंट चाळीस हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

यासोबतच या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14 लाख 74 हजार रुपये आहे व त्यासोबत या कारमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन आणि सहा एअरबॅग सारखी फीचर्स देण्यात आलेली आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe