Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ११ मतदारसंघात मतदान असल्याने सकाळपासूनच मतदार घराबाहेर पडत आहेत. यात अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित अहमदनगर लोकसभा जागेसाठीही मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
दरम्यान एक महत्वाची बातमी या मतदार संघातून आली आहे. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील एका मतदाराने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर येत मतदान केले.
या अनोख्या पद्धतीने मतदान केल्यानंतर सध्या याचीच चर्चा सुरु आहे. शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी त्रिंबक भदगले यांची ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे. कांद्याच्या आणि दुधाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. या गोष्टींचा निषेध म्हणून हातात दुधाची बॉटल आणि गळ्यात कांद्याची माळ घालून ते आले होते.
अहमदनगरमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत 29.93 टक्के मतदान
अहमदनगर मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत 29.93 टक्के मतदान झाले आहे. यात सध्या शेवगाव आघाडीवर असून तेथे 32.62 टक्के मतदान झाले आहे. तर पारनेरमध्ये कमी 27.30 टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत झाले होते. आकडेवारी खालीलप्रमाणे –
शेवगाव – 32.62
राहुरी – 29.01
पारनेर – 27.30
अहमदनगर शहर – 30.63
श्रीगोंदे – 28.42
कर्जत जामखेड – 31.40
एकूण – 29.93
उन्हामुळे गर्दी ओस पडण्याची शक्यता
दुपार पर्यंत अनेक ठिकाणी गर्दी झालेली होती. मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दुपारी मात्र उन्हाच्या चटक्याने मतदार घराबाहेर कमी पडतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी पुन्हा गर्दी होऊ शकते. रात्री सर्व टक्केवारी समोर येईल.
४ जून ला मतमोजणी
दरम्यान अहमदनगर व शिर्डी मतदार संघाची आज निवडणूक व ४ जून ला मतमोजणी होणार आहे.