Monsoon 2024 बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी ! यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार; ‘या’ तारखेला पोहोचणार अंदमानात, हवामान खात्याचा नवा अंदाज

Published on -

Monsoon 2024 New Update : मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास संपण्यात जमा आहे. यामुळे सध्या शेतजमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन केव्हा होणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत.

मोसमी पावसाला कधी सुरुवात होणार याकडे चातकाप्रमाणेच शेतकरी राजाचे आणि उकाड्याने हैराण झालेल्या जनतेचे विशेष लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला.

गेल्या वर्षी मानसून कमकुवत होता यामुळे शेतकऱ्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले. शेतकऱ्यांना खरीप हंगामातून अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. खरिपसमवेतच रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे उत्पादन मिळाले नाही आणि यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडलेत. मात्र यंदा तशी परिस्थिती राहणार नाही.

कारण की, भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मान्सून 2024 बाबतच्या आपल्या पहिल्या अंदाजात यंदा मान्सून समाधानकारक राहणार असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे यावर्षी समाधानकारक मानसून राहिला, महाराष्ट्रासमवेतच देशात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर यंदा शेतकऱ्यांना चांगल्या कमाईची आशा आहे.

दरम्यान मान्सून 2024 संदर्भात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सूनचे आगमन यावर्षी वेळेआधीच होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी 21 मे च्या सुमारास मान्सूनचे अंदमानात आगमन होत असते. यंदा मात्र परिस्थिती मानसून साठी खूपच पोषक आणि पूरक असून यामुळे मान्सूनचे आगमन यंदा अंदमानत दोन दिवस आधीच होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून नुकतीच वर्तवण्यात आली आहे.

यावर्षी नैऋत्य मौसमी वारे अर्थातच मानसूनचे 19 मे 2024 ला अंदमानत आगमन होणार असा मोठा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 19 मे ला अर्थातच येत्या सहा दिवसांनी मान्सूनचे अंदमानात आणि निकोबारमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे.

म्हणजे यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात पोहोचणार आहे. दक्षिण अंदमान समुद्र जवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मॉन्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.

मानसून दरवर्षी एक जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर सात दिवसांनी अर्थातच आठ जूनच्या सुमारास तो आपल्या महाराष्ट्रात अर्थातच तळ कोकणात दाखल होतो. मान्सूनचे तळ कोकणात आगमन झाल्यानंतर पुढे तो मुंबईमध्ये सलामी देतो आणि त्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो.

गेल्या वर्षी मात्र मान्सूनचे आपल्या महाराष्ट्रात उशिराने आगमन झाले होते. यंदा मात्र मानसून अंदमानात लवकर पोहोचणार असा अंदाज समोर आला असल्याने केरळमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात देखील यावर्षी मान्सून काहीसा लवकर येऊ शकतो अशी आशा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe