Ahmednagar News : अहमदनगरसह तीन जिल्ह्यात हवामानाचा अलर्ट ! 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Published on -

Ahmednagar News : मागील दोन ते तीन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचे संकट उभे राहिलेलं आहे. अनेक भागात अवकाळी पावसाने व वादळाने मोठे नुकसानही केले आहे.

आता पुन्हा एकदा हवामान विभागाने एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत आज (दि.१३) दुपारी हवामान विभागाने एक अलर्ट जरी केला आहे. त्यानुसार 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक माहिती नुसार, पुणे, अहमदनगर, रायगड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहील. गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 3-4 तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात धुळीचे वादळ, जोरदार पाऊस, नागरिकांत घबराट
दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व ग्रामीण परिसरात दुपारी पावसाचे वातावरण तयार होऊन धुळीचे वादळ आले होते. त्यानंतर पावसाला जोरदार सुरवात झाली. त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील भागात गडगडाटी वादळ व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe