Ahmednagar Politics : ‘अहमदनगर’ दक्षिणेत १९५२ नंतर पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान ! कुठे किती मतदान झाले? खरी आकडेवारी समोर

Ahmednagarlive24 office
Published:
sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघांत १३ मे रोजी मतदन प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अनेक अंदाजे आकडेवारी सगळीकडे सांगितली जात होती. आता मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात ६६.६१ टक्के मतदान झाले असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १९५२ नंतर पहिल्यांदाच ६५ टक्क्यांच्या पुढे वाढ झाली आहे. यात पारनेर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ७०.१३ टक्के झाले आहे.

त्यानंतर राहुरीमध्ये ७० टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी नगर शहरात ६२.५० टक्के मतदान झाले आहे. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतांचा टक्का वाढला तर शिर्डीत घटला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात ६४.८६ टक्के मतदान झाले होते, त्याचवेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६४.६७ टक्के मतदान झाले होते. नगरमध्ये १.७५ वाढले तर शिर्डीत १.६४ टक्के मतांमध्ये घट झाली आहे.

अहमदनगर मतदारसंघासाठी सोमवारी ६६.६१ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७०.१३ टक्के झाले आहे. त्यानंतर राहुरीमध्ये ७० टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी नगर शहरात ६२.५० टक्के मतदान झाले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी ६३.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६५.७७ टक्के मतदारांनी मतदान केले तर सर्वांत कमी मतदान अकोले विधानसभा मतदारसंघात ५९.८२ टक्के
झाले.

१९५२ नंतर पहिल्यांदाच…
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १९५२ नंतर पहिल्यांदाच ६५ टक्क्यांच्या पुढे वाढ झाली आहे. यापूर्वी १९८४ मध्ये ६४ टक्के मतदान झाले तर २०१९ मध्ये ६४.८६ टक्के मतदान झाले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ६६.६१ टक्के मतदान झाले आहे.

कडवी टक्कर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सुजय विखे- पाटील व महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. यावेळी एमआयएमने निवडणुकीतून माघार घेतली होती तर ‘वंचित’चा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे सुजय विखे- पाटील आणि नीलेश लंके यांच्याभोवतीच प्रचार फिरत राहिला.

शिर्डीत महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व ‘वंचित’च्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत झाली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी (नगर)
शेवगाव-पाथर्डी : ६३.०३
राहुरी : ७०
पारनेर : ७०.१३
नगर शहर : ६२.५०
श्रीगोंदा : ६७.९०
कर्जत-जामखेड : ६६.१९

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe