Post Office Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. आपल्याकडील पैसा दुप्पट तर झाला पाहिजे मात्र जोखीम शून्य असली पाहिजे असे अनेकांना वाटते. यामुळे अनेक जण बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करतात. बँकेत एफडी करणे फायदेशीर ठरते. अलीकडे बँकांनी एफडीवर चांगले व्याज द्यायला सुरवात केली आहे.
यामुळे अलीकडे गुंतवणूकदार बँकेच्या एफडी योजनेकडे विशेष आकृष्ट होत आहेत. महिला गुंतवणूकदार देखील आता मोठ्या प्रमाणात एफडी मध्ये गुंतवणूक करत असल्याचे चित्र आहे.
तथापि अनेकांच्या माध्यमातून एफडी पेक्षा अधिकचा परतावा देणारी योजना कोणती आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामुळे आज आपण एफडी पेक्षा अधिकचा परतावा देणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण पोस्टाच्या ज्या बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेत एफडी पेक्षा अधिकचे व्याजदर मिळतच आहे. शिवाय या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही एफडीप्रमाणेचं सुरक्षित आहे. पोस्टाच्या या योजनेत गुंतवलेला पैसा सुरक्षित असून या योजनेवर खात्रीशीर परतावा मिळतो.
विशेष बाब अशी की या योजनेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गुंतवणूक केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आणि या अर्जात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे.
यामध्ये त्यांनी पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट या स्कीम मध्ये नऊ लाख 12 हजार रुपयांची गुंतवणूक असल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत आज आपण पोस्टाच्या या नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीमची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम
ही एक सरकारी स्कीम आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असून यातून खात्रीशीर परतावा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. ही एक डिपॉझिट स्कीम असून यावर सध्या 7.7% या रेटने व्याज दिले जात आहे. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम ही पाच वर्षांसाठी असते.
या स्कीममध्ये सिंगल अकाउंट ओपन केले जाऊ शकते किंवा जॉइंट अकाउंट देखील ओपन केले जाऊ शकते. विशेष म्हणजे नाबालिक मुला मुलींच्या नावाने त्यांचे आई-वडील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. नॅशनल सेविंग सर्टिफिकेट मध्ये एकाच वेळी अनेक अकाउंट ओपन केले जाऊ शकतात.
किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाहीये. म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला हवी तेवढी रक्कम या योजनेत तो गुंतवू शकतो. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
पीएम मोदी एवढी गुंतवणूक केली तर किती रक्कम रिटर्न मिळणार
जर तुम्ही पीएम मोदी यांनी जेवढे पैसे गुंतवलेत म्हणजेच नऊ लाख 12 हजार रुपये या योजनेत गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटी वर अर्थातच पाच वर्षांनी 13 लाख 21 हजार 519 रुपये मिळणार आहेत. म्हणजे चार लाख 9 हजार 519 रुपये तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहेत.