Ahmednagar News : हळदीच्या कार्यक्रमासाठी आले, जिपचे हॅन्डल लॉक होऊन अपघात, एक ठार चौघे जखमी

Published on -

Ahmednagar News : कोल्हार घोटी रस्त्यावरील राजूर जवळील केळुंगण शिवारात जीप पलटी होऊन झालेल्या अपघातात निहाल संतोष रूपवते (वय १९, रा. अकोले) हा युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (१६ मे) सायंकाळी घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी : मृत तरुण निहाल हा अकोले तालुक्यातील रंधा येथे आपल्या नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आला होता. यानंतर तो आपल्या चार मित्रांसह एमएच ०५, एएक्स ०८६५ ही जीप घेवून रंधा येथून राजूर येथे गाडी धुण्यासाठी घेवून येत होता.

येत असताना केळुंगण शिवारात गाडी आल्यानंतर तिची स्टिअरिंग लॉक झाली आणि जीप पलटी झाली. यात मृत तरुण रूपवते हा गाडी खाली सापडला आणि त्याचा मृत्यु झाला.

घटनेची माहिती समजताच राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आपले कर्मचारी अशोक गाडे, विजय मुंढे, राकेश मुळाणे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये स्वप्निल दिवे (राजूर), पारस पराड (खिरविरे), अनिकेत सोनवणे (शिंगणवाडी), सागर पवार (रंधा) हे चौघे तरुण मात्र किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी पंचनामा केला होता. मृता मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. राजूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. निहालचे वडील संतोष रुपवते हे अकोले नगरपंचायत मध्ये नोकरीला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी व गावावर शोककळा पसरली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News